Showing posts with label Marathi poems. Show all posts
Showing posts with label Marathi poems. Show all posts

Sunday, January 22, 2012

बाबा..


एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही..!! ♥

Tuesday, January 10, 2012

त्या व्यक्तींना नेहमी जपा..



आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे काही विसरायला तयार असते....

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्‍यांपासून दुरावायला तयार असते....
...
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुखवू
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते .......

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका गमवू
जी व्यक्ती तुमच्यासाठी कसलाही त्याग करायला तत्पर असते....

आयुष्यात त्या व्यक्तीच्याकडे कधीचं पाठ नका फिरवू
जी व्यक्ती सार्‍या जगाने आपल्याकडे पाठ फिरवली तरी आपल्या सोबत असते....

त्या व्यक्तींना नेहमी जपा
कारण .............
जगासाठी तुम्ही कोणी एक असाल ......
तुमच्यासाठी ती व्यक्ती कोणी एक असेल ......
पण त्या व्यक्तीसाठी तुम्ही त्यांचे जीवन असतात...
त्यांच्यासाठी तर सारे जग तुमच्यातचं सामावलेले असते .....

Saturday, January 7, 2012

नक्कीच होतील स्वप्ने खरी...

काल वाटेत भेटली
इवलुशी एक मुंगी
मला हँलो म्हणायची
नाही घेतली तिने तसदी
...

मीच तिला मग
अडवले जबरदस्ती,
म्हटले एव्हडी काय
ग तुला कामाची घाई?

उत्तर तिचे ऐकुन
मजा मला वाटली,
म्हणे काम केल्याशिवाय
कस निभायचे बाई?

रस्ता तिचा अडवल्यावर
वेगळी वाट तिने शोधली,
जातांना मात्र माझ्याकडे
बघुन खुदकन हसली

वाटते क्षुद्र तुम्हाला
मुंग्यांचे जीवन जरी,
त्याच्यातच सामावलीये
आयुष्याची 'Philosophy' सारी

रस्त्यात अपुल्या अडथळे
कित्येक दिसले तरी,
शोधत रहा मार्ग आणखी
नक्कीच होतील स्वप्ने खरी...