Thursday, May 17, 2012

Marathi Jokes 7


 गुरुजी : तू शाळेत कशासाठी येतोस धोंडू ? धोंडू : विद्या मिळवण्यासाठी गुरुजी ! गुरुजी : मग गाढवा तू समोर फळ्याकडे पहायचं सोडून पोरीनकडे काय बघतोस ??? धोंडू : अहो गुरुजी पोरींकडे नाही पाहत मी. मी तर विद्या कडे पाहतो.आता तुम्हीच सांगा ना गुरुजी विद्या मिळवण्यासाठी विद्येकडे नाही पहायचं तर काय फळ्याकडे पहायचं का ???

*******************************************************************************

एकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो, पण शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत नाही. त्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात. तेव्हा रस्त्यात त्याला एक केळेवाला दिसतो. पैलवान लगेच त्याला बद्डून ३-४ डझन केळी घेउन खायला लागतो. त्याचवेळी तिथून प्राणिसंग्रहालयाचा मालक जात असतो. तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो “अरे , किति दिवस असा चोरुन खाणार आहेस ? माझ्याकडे काम कर , दिवसाचे १०० रुपये आणी पाहिजे तेव्हढे जेवण मिळेल. मग पैलवान त्याच्याबरोबर zoo मध्ये जातो, तिथे त्याला एक गोरिलाची कातडी मिळते जी त्याला , दिवसभर पांघरुन रहायचई असते. असाच एका दिवशी , तो पिंजऱ्याला टेकुन उभा, राहिला असताना , पिंजऱ्याची भिंत तुटते आणी तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाउन पडतो. त्याबरोबर , तो “वाचवा , वाचवा ” ओरडत पळु लागतो, सिंह त्याच्या जवळ आलेला असतो , तो गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो “गप्प बैस , नाहितर दोघांचीही नोकरी जाईल !

*******************************************************************************

वडील आपल्या मुलाला म्हणतात- “यावेळी जर तू नापास झालास….. तर मला बाबा म्हणायचं नाही.” . . मुलगा निकाल घेऊन घरी येतो. वडील- “काय रे काय लागला निकाल?” मुलगा म्हणतो- . . . . . . “चूप बस मधुकर….. तू वडील असल्याचा हक्क गमावला आहेस.”

*******************************************************************************

संता द्राक्षं विकायला बसला होता. टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता. तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. बंता : अरे तू द्राक्षं विकायला बसलायस आणि ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ का ओरडत सुटलायस? संता : शू…..हळू बोल. माशा ऐकतील ना.

*******************************************************************************

हत्ती आणि मुंगी चिंटी : एक विचारेन म्हणते. जम्बो : विचार की. … चिंटी : तुझं वय काय रे? जम्बो : मी पाच वर्षांचा आहे. चिंटी : काय सांगतोस काय… फक्त पाच वर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड? जम्बो : हा हा हा… I AM COMPLAN BOY…… बरं मला सांग, तुझं वय काय गं? चिंटी : माझं वय पण पाच वर्षं. जम्बो : अगं पाच वर्षं वय आणि केवढीशी दिसतेस… चिंटी : वही तो… I AM SANTOOR GIRL…… मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता